महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार;
जालन्याचे खासदार कल्याणराव काळे,कुणाल चौधरी,संदेश आंबेडकरही राहणार उपस्थित; राजा टॉवरजवळ होणार सभा…
चिखली (प्रशांत जैवाळ)

चिखली विधानसभा मतदारसंघासाठी यावेळीही काँग्रेसने माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन बेरजेच्या राजकारणावर भर दिला.. आता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज २९ ऑक्टोंबरला प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत राहुल बोंद्रे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.विशेष म्हणजे बुलडाणा जिल्हा काँग्रेसवर ज्यांचा एकहाती आदरयुक्त वचक आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक आज राहुल बोंद्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत.सोबतच जालन्याचे खासदार कल्याणराव काळे, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी, संदेश आंबेडकर यांचीही उपस्थिती आहे. चिखली विधानसभा
मतदारसंघातील तमाम जनतेने
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहुन आशिर्वादाचे पाठबळ द्यावे असे आवाहन महाविकास आघाडीचे राहुल बोंद्रे यांनी केले आहे..

माजी आमदार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांचा अर्ज भरतेवेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर,राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, दिलीप कुमार सानंदा,धृपतराव सावळे,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील,
सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड,
रामविजय बुरुंगले,अनंतराव वानखेडे,ज्ञानेश्वर पाटील,धनंजय देशमुख,हाजी दादूसेठ,नरेश
शेळके,जयश्रीताई शेळके, स्वातीताई वाकेकर,
दिलीपराव जाधव,शैलेश सावजी यांच्यासह विविध
मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Users Today : 21