मी उच्च शिक्षक असून माझ्या स्पर्धेत सध्या तरी कोणीच उमेदवार दिसत नाही माझे नावावर साधी एन.सी पण दाखल नाही गुणवंत मध्ये मी फर्स्ट आहे सतीश पवार भीम आर्मी

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा-: विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी भीम आर्मीने एक सक्षम आणि तूल्यबळ उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांना मैदानात उतरविले आहे. नागपूर येथे पक्षाच्या वतीने एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.

भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या नेत्यांनी २४ ऑक्टोबरला नागपूर येथे विदर्भातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सतीश पवार यांनी संघर्षवीर खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात भीम आर्मीमध्ये सातत्यपूर्ण काम केले. अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला न्याय मिळवून दिला. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सर्वसामान्यांसोबतच बेरोजगार, विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावल्या. राजकारणातून माघार घ्यावी म्हणून त्यांना अनेक धमक्या आल्या; परंतु त्याला सतीश पवार यांनी कधीही जुमानले नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने बुलढाणा विधानसभेतून सतीश पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी गौरीप्रसाद उपासक, महासचिव मनीष साठे यांनी सतीश पवार यांच्याकडे एबी फॉर्म सुपूर्द करून विधानसभा जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी भीम आर्मीचे माजी प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, विदर्भ कार्याध्यक्ष विलास राऊत, जिल्हा प्रभारी प्रा. कडूबा पैठणे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

 

समाजाच्या अस्तिवासाठी लढणार

शत्रू कितीही बलाढ्य असला तरी समाजाच्या अस्तित्वासाठी खांद्यावर निळा झेंडा घेऊन लढणार, अशी प्रतिक्रिया सतीश पवार यांनी व्यक्त केली.

0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *