आमदार श्वेताताई रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील ! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन हजारोंच्या साक्षीने श्वेताताईंनी भरला उमेदवारी अर्ज

Khozmaster
2 Min Read
चिखली : 
चिखली विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी २८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चिखली शहरातील खामगाव चौफुली येथून विराट महारॅली निघाली. बसस्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक मार्गे ही रॅली राजा टॉवर येथे पोहोचली. त्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी  नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी, वारकऱ्यांचा, मातृशक्तीचा जयघोष, श्वेताताई तुम आगे बढोच्या घोषनेने परिसर दणाणला होता. सभेच्या ठिकाणी जिकडे,तिकडे महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे यामुळे एक वेगळाच उत्साह श्वेताताईच्या समर्थकांमध्ये होता.
       राजा टॉवर येथे झालेल्या भरगच्च सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्वेताताईच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. श्वेताताईनी केलेली कामे केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात केली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र महायुती सरकार आल्यानंतर चिखली विधानसभा मतदार संघासाठी आम्ही खजिना खुला केला असे म्हणत श्वेताताईवर प्रेम करणारी ही गर्दी पाहून श्वेताताई यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
     यावेळी टाळ्यांचा एकच गजर झाला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, माजी आमदार विजयराज शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशबुवा जवंजाळ, प्रतापसिंह राजपूत, रामकृष्णदादा शेटे, सुनील पोफळे, भाई विजय गवई, शेख अनिस, संजय चेके पाटील, शंतनू बोंद्रे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *