पॉलिटिक्स ! उबाठाच्या चालत्या गाडीतून वंचितच्या धावत्या गाडीत स्वार झालेल्या प्रा. सदानंद माळींना वंचीतने उतरविले ! – प्रशांत वाघोदे यांना ऐनवेळी दिली तिकीट ! – वंचित चे सुप्रीम बाळासाहेब आंबेडकर यांची खेळी काय ?

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : उबाठाच्या चालत्या गाडीतून वंचितच्या धावत्या गाडीत प्रा. सदानंद माळी बसले खरी परंतु
ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी कडून प्रशांत वाघोदे यांना सिट दिल्याने प्रा. माळी ऐवजी आता वाघोदे यांच्या
विधानसभा निवडणुकीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून
प्रा.सदानंद माळींचा पत्ता कट झाला असून वंचितची उमेदवारी प्रशांत वाघोदे यांना देण्यात आली आहे. सदानंद माळी
यांना वंचित बहुजन आघाडी कडून बुलढाणा विधानसभा करिता उमेदवारी घोषित करण्यात आली होती. याची सर्वात
पहिले ब्रेकिंग बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केली होती.पण कार्यकर्त्यांच्या अग्रस्तव ही जागा वाघोदे यांना देण्यात
आली आहे. माळींचा पत्ता कट करून वाघोदेंना उमेदवारी देण्यात आली असल्याने वंचित ची सुप्रीम बाळासाहेब
आंबेडकर यांची नेमकी खेळी काय ? याबाबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चर्चा होत आहे.
·संविधानवादी जनतेने उमेदवारी दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे !

0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *