बुलढाणा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन जमा. देऊळगाव राजा/ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली होती प्रथम मागणी

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा  : 
महाराष्ट्रातील दिवाळी हा सर्वात मोठा साजरा केला जातो उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळेसाठी एक सुट्टीचे पर्व म्हणून दिवाळीची
सुट्टी बघितली जाते या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे बाहेर शिकत असलेले पाल्य आपापल्या घरट्याकडे येतात तसेच
सर्व विवाहित महिलाही दिवाळी निमित्त माहेरी येतात. सर्वजण हा उत्सव एकत्र येऊन साजरा करत सर्वांना नवीन कपडे घेतले
जातात, शेतकरी ही शेतातून निघालेले पिके विकून दिवाळी साजरी करतो तसेच कर्मचाऱ्यांनाही आर्थिक आवश्यकता असते
त्यामुळे या महिन्यातील वेतन हे दिवाळीपूर्वी होणे गरजेचे होते म्हणून माननीय आमदार सुधाकरजी अडबले व विदर्भ माध्यमिक
शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी की मागणी केली होती तसेच सर्व संघटनेने ती मागणी लावून धरली त्यामुळे
संपूर्ण महाराष्ट्रातच शासनाने सर्व शिक्षकांना दिवाळीपूर्व वेतन अदा करण्याचे आदेशित केले होते आज गायत अनेक जिल्ह्यातील
वेतन जमा झालेले आहेत तसेच उर्वरितही पुढील दोन दिवसात जमा होणार आहे. आमदार सुधाकरजी अडबले आणि विदर्भ
माध्यमिक शिक्षक संघ नेहमीच शिक्षकांच्या समस्या समयसुचकतेने मांडून सोडून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात यापूर्वीच
नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आयोजित केले होते मात्र विमाशीच्या प्रयत्नाने सदर प्रशिक्षण तूर्तास पुढे
ढकलनार आहे.

0 9 4 9 9 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *