बुलढाणा यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी उफाळून आल्याचे दिसतेय विशेषतः
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ व चिखली विधानसभा मतदारसंघात कोणते बंडोबा विद्यमान आमदारांच्या
राजकारणाचा खेळखंडोबा करतील किंवा स्वतःचा करून घेतील हे सध्या तरी सांगता येत नाहीये.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व अधिकृत उमेदवार संजय गायकवाड
यांच्या विरुद्ध भाजपाचे लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल
केलाय. त्यांनी भाजपाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली असून पक्षश्रेष्ठींनी न दिल्यास अपक्ष म्हणून लढणार
असल्याचे स्पष्ट केल्याने ही बंडखोरी निश्चित मानल्या जात आहे.दरम्यान शिंदे यांनी भाजपाला गलिच्छ समजत
असल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप केल्याने त्यांनी देखील भाजपातून शिंदे यांची हकालपट्टी करण्याची मागणी
केली आहे.
पॉलिटिक्स ! ऐन दिवाळीत बंडखोरांचे फटाके! – बंडोबा करतील महायुतीचा खेळखंडोबा? – संजूभाऊ व श्वेताताईपुढे कडवे आव्हान !
0
9
4
9
9
1
Users Today : 22
Leave a comment