बुलडाणा : ओठावर मिसरूडही नव्हती तेव्हापासून शिवसेना या चार अक्षराचा मंत्र
जपल्याने माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांना प्रतिष्ठा मिळाली. मी जे काही आहे ते शिवसेनेमुळे आहे,
मातोश्रीमुळे आहे. गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाही. उद्धव साहेबांनी दिलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे.
त्यामुळे जयश्रीताईच्या विजयासाठी जीवाचे रान करीन. पद येतात आणि जातात. सत्ता येते आणि जाते. मात्र
जनमानसामध्ये असलेला विश्वास कधीही गमावता कामा नये. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे
यांच्या सोबतच राहू. ताई काळजी करू नका तुमच्यासाठी हा भाऊ ढाल म्हणून काय पुढे राहील असे
अभिवचनच एका प्रसिद्धीपत्रकातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी
दिले.शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत पुढे म्हणाले की, जिल्हाप्रमुख या नात्याने बुलडाणा मतदारसंघाची सर्वात जास्त जबाबदारी
माझी आहे. २०१४, २०१९ या दोन्ही वेळा माझे तिकीट कटले. माझ्यासाठी पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे असं मानणारा मी एक
सामान्य कार्यकर्ता आहे. शिवसेना फुटीनंतर आम्ही रात्रंदिवस काम करून इथे शिवसेनेची पुन्हा एकदा भक्कम तटबंदी उभी केली.
दोन आमदार, एक खासदार सोडून गेल्यानंतरही डगमगलो नाही. हल्ले पचवले, तक्रारीचे राजकारण आमच्या विरोधात झालं.
जीवाला जीव देणारे कार्यकर्ते सवंगडी या दरम्यान मिळाले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा बुलढाणा
जिल्ह्यातच आम्ही घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे.बुलढाणा विधानसभा मतदारसंघ लढण्याची पूर्ण तयारी केली होती. घाटावर घाटाखाली पक्ष संघटन बांधलं. गावागावात पायी मशाल
जागर यात्रा काढली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आक्रोश मोर्चा शिवसेनेच्या इतिहासातला “‘न भूतो” असा मोर्चा ठरला.
या मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू देखील सरकली होती. या मतदासंघात २५ ते ३५ हजार मतांनी जयश्रीताईंनी निवडून
येतील असा विश्वास जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला. जयश्रीताईंच्या विजयासाठी मी जिवाचे रान करील असे जालिंधर बुधवंत
म्हणाले. मी उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे .. हा जालिंदर बुधवत गद्दार होणार नाही,
बेईमान होणार नाही .. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करू असे जालिंधर बुधवंत यावेळी म्हणाले. २०
तारखेला मशाल पेटवा असे आवाहनही शेवटी त्यांनी केले .
पद आणि सत्ता येते – जाते, गद्दारी माझ्या रक्तात नाही; जालिंधर बुधवंत यांचे प्रतिपादन …. जयश्रीताईंच्या विजयासाठी जीवाचे रान करीन!
0
9
4
9
9
1
Users Today : 22
Leave a comment