चिखली :
केंद्र व राज्यातील शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गावर आर्थीक संकट कोसळल्याने मेटाकुटीस आला आहे. तर राज्यातील उद्योगधंदे परराज्यात नेवून महराष्ट्रातील बेरोजगाराची कुऱ्हाड चालविणाऱ्यांच्या भुलथापांना बळी न पडता राज्यातील सत्ता उलटवुन टाकण्यात बुलडाणा जिल्हयाचा सिंहाचा वाटा असायलाच हवा, त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवारा विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांना प्रचंड मताधिक्य देवुन विधान सभेत पाठवा, असे आवाहन अभाकॉचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक यांनी चिखली येथे 29 ऑक्टोंबर रोजी केले.
हिंदु धर्मीय गीतेवर, तर मुस्लीम धर्मीय कुराणावर चालतो त्याचप्रमाणे भारत देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधावर चालतो, आणि जाती, धर्म, पंथात विष पेरून भांडने लावणाऱ्या तसेच संविधानाला नष्ट करू पाहणाऱ्या मनुवाद्यांना संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरी जनतेने राज्यातील सरकार उलथून टाकण्याकरीता राहुलभाऊ बोंद्रे यांच्या पंजा या निशाणीला प्रचंड मताधिक्य देवुन बळकटी देण्याचे आवाहन अखिल भारतीय बुध्दीष्ट सोसायटी इंडीयाचे चेअरमन संदेश आंबेडकर यांनी केले.
चिखली विधानसभा मतदार संघातील उसळलेल्या विराट जनसमुदायाच्या गर्दीच्या साक्षीने कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांनी ऐतिहासीक राजाटॉवर येथील जाहीर सभेनंतर आपला नामाकंन अर्ज दाखल केला. सभास्थळी उसळलेली विशालकाय गर्दी राहुलभाऊच्या विजयावर शिक्का मोर्तब करणारी ठरली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळुच नव्हे तर जमीनही घसरल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत असल्याचे दिसुन आले.

सुडबुध्दीचे राजकारण केल्याने विकास होत नाही – डॉ. राजेंद्र शिंगणे
देशासह राज्यातील सामाजा समाजात विष पेरून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम मोदी व शिंदे- फडणवीस सरकारने गत काळात केल्यामुळे दंगली घडुन आणुन अशातंता व अराजक्ता निर्माण करण्याचं काम केले. सुडबुध्दीचे राजकारण केल्याने विकास होत नसुन येत्या काळात राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची परीस्थीती बदलण्याकरीता राहुलभाऊना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.
हवालदिल शेतकरी व बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्याकरीता तसेच मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातुन कॉग्रेसने राहुलभाऊ बोंद्रेच्या स्वरूपातुन दिलेल्या उमेदवारीच्या संधीचं सोनं चिखलीतील मायबाप जनतेने करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन सौ. रेखाताई खेडेकरांनी केले.
ऐकीकडे लोकसभेत पराभवामुळे जिव्हाळी लागलेल्या प्रसंगातुन उभारी घेण्याकरीता लाडकी बहीण योजना आणुन बहिणींना १५०० रू पये दयायचे, अणं त्याच लाडक्या बहीच्या चुमूकल्या मुलीवर अत्याचार अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालायचे, असंवेधनशिल व नित्कृष्ठ दर्जाच्या कामांची पाठराखन करणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवण्यासाठी राहुलभाऊना पुन्हा विधानसभेत पाठावा, असे प्रतिपादन शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.
यावेळी कॉग्रेस पक्ष निरीक्षक संदिप मंगरोला गुजरात, आमदार धिरज लिगांडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, भाई प्रदिप आंभारे, विष्णु पाटील कुळ सुंदर, रिजवान सौदागर, प्रा. निलेष गावंडे, नंदु कन्हाडे, गजानन वायाळ, विश्वास खंडागळे आदि मान्यवरांची समयोचित भाषने झाली. तर यावेळी वासिनिकांच्या हस्ते गत निवडणुकीतील वंचित पक्षाचे उमेदवार अशोक सुरडकर यांचा व इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी अॅड. गणेशराव पाटील, बाळासाहेब भोंडे, सौ. ज्योतीताई खेडेकर, संजय राठोड, छगणदादा मेहेत्रे, शैलेश सावजी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन प्रख्यात कवी अजिम राही यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच विभाग, सेल, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व शेतकरी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कर्मयोगी पित्याचं छत्र हरविले मात्र जनतेने आशीर्वाद रूपी छत्र द्यावे : राहुलभाऊ बोंद्रे
केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने संविधान व लोकशाही अडचणीत आणल्याची उदाहरणे देत मतदार संघातील तब्बल ४ हजार मतदारांची नावे यादीतुन वगळण्याच्या केलेल्या कृतीचे षडयंत्र आपण दिलेल्या लढयातुन उघडे पाडले. विकास कामांच्या नावावर कमिशनच्या स्वरूपातुन प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केल्याचे सर्वस्त्रोत आहे. आम्ही उभारलेली गरूडझेप शिक्षण व इतर प्रकल्प त्यांनी बंद पाडलीत, आपल्या आशीर्वादाने विधानसभेत गेलो तर लाडकी बहीण योजना बंद न पडु देता १५०० ऐवजी २००० रूपये महिना देण्याचे सांगुन मुलींच्या सक्षमीकरणा करीता विविध प्रकल्प राबविणार असल्याचे राहुलभाऊनी सांगितले तर गत काळात मला संपवू पाहणाऱ्यांच्या विरोधात गावागावातुन मोठ्या प्रमाणात मला पक्ष प्रवेशाच्या माध्यमातुन समर्थन प्राप्त होत आहे. गत काळात मला संपविण्याकरीता सत्ताधाऱ्यांकडुन सर्व प्रकारचे प्रयोग करून वापरीत असंख्य अडचणी निर्माण करण्यात आल्या मात्र त्यावर मी आपल्या आशिर्वादामुळे मात करू शकलो. कर्मयोगी स्व. तात्यासाहेब यांनी आपल्या हयातीत संघर्षातुन चिखली मतदार संघात शैक्षणीक क्रांती घडवीत सहकाराची उभारणी केली. त्यांच्याकडुनच सामाजिक, राजकीय, धार्मीक क्षेत्रात कार्य करण्याचा वारसा आपणास लाभला असुन त्यांनी दर्शविलेल्या तत्वावर मी चालत आहे. मात्र पित्याचे छत्र हरवल्या नंतर मला माझा खरा मार्गदर्शक व काळजीवाहू गेल्याची उणिव आज भासत असल्याचे सांगितले. राहुलभाऊनी पित्याचे छत्र हरविले मात्र मायबाप जनतेने मतदान स्वरूपातुन आशीर्वाद रूपी छत्र प्रदान करण्याचे भावणीक आवाहन यावेळी केले.
Users Today : 22