श्वेताताईंच्या चिखली येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिसली आर्ल महायुतीची एकजूट! धाड, रायपूर, उदयनगर व अमडापूर येथे झाला प्रचाराचा शुभारंभ!

Khozmaster
3 Min Read

चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीने
निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या चिखली
येथील खंडाळा रोडवर सुरू करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे दि. २ नोव्हेंबर रोजी
बलिप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन झाले. याशिवाय आजपासून धाड, रायपूर, अमडापूर व
उदयनगर अशा अन्य चार सर्कलमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महायुतीमध्ये
असलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी घटक पक्षांची
एकजूट प्रकर्षाने दिसून आली.चिखली येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम
जेष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली व पार
पडला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे
जिल्हा कार्याध्यक्ष शांतनु बोंद्रे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चिखली येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय
कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, सुनील वायाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख
शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के, प्रचार कार्यालयाचे प्रमुख प्रेमराज
भाला, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, कृष्णकुमार सपकाळ, सुरेंद्र पांडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, अल्पसंख्यांक
आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित आदी
पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यामुळे चिखली मतदारसंघ प्रगतीच्या मार्गावर केवळ अडीच वर्षात अग्रेसर झाल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील प्रत्येक
जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्वेताताई महाले यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून प्रत्येक सर्कलमधून महायुतीच्या उमेदवार असलेल्या आ. महाले यांना मताधिक्य मिळेल असा
विश्वास दांडगे यांनी व्यक्त केला.

विकासाला अधिक गती देण्यासाठी पुन्हा श्वेताताईंना विजयी करावे
महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून या सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी
आपला खजिना खुला केला आहे. आ. श्वेताताई महाले यांनी महायुती सरकारच्या प्रत्येक योजनेची चिखली मतदारसंघात उत्तम
रीतीने अंमलबजावणी केली असून त्याचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवले आहेत. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार
असल्याने महायुती मधील शिवसेनेसह सर्वच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी श्वेताताई महाले यांचा प्रचार करावा व
मतदारसंघातील विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी पुन्हा आ. श्वेताताई महाले यांनाच विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे
उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांनी यावेळी केले.

0 9 4 9 9 6
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *