माय बाप जनतेने अफवांना बळू पडू नका; शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे आवाहन; डॉ. ऋतुजा चव्हाण यांना रोखण्यासाठी विरोधक पसरवत असल्याचा केला आरोप!

Khozmaster
2 Min Read

मेहकर  – मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी
तसेच शेतकरी संघटना क्रांतिकारीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी
प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे विरोधक चांगलेच बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू
सरकली आहे असा घणाघात शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केला आहे. डॉ. ऋतुजाताई
यांच्याविरोधात प्रचारासाठी काहीच मुद्दे नसल्याने त्यांनी त्यांच्याविरोधात अफवांचा बाजार गरम
केला आहे. परंतु, मतदार मायबाप व नागरिकांनी या अफवांकडे लक्ष देऊ नये, डॉ.ऋतुजा चव्हाण
यांना विधानसभेत पाठवून या मतदारसंघाचा कायापालट करण्याची संधी द्यावी, असे आवाहन
शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केलेले आहे.डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्या पाठीमागे
भरभक्कमपणे उभी झालेली शेतकरी चळवळ व वंचित बहुजन आघाडीची पोलादी फळी
यामुळे मतदारसंघात त्यांचे पारडे जड झालेले आहे. ऋतुजाताईंच्या राजकीय विरोधकांना त्यांच्या विरोधात प्रचारासाठी एकही मुद्दा
हाती लागत नाही. तसेच, डॉ. ऋतुजाताई या विकासकामांवर प्रश्न विचारत असल्याने अनेकांची मोठी पंचाईत होत आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, उद्योजक, शेतमजूर, कष्टकरी हे सर्वच घटक हवालदिल झालेले आहेत.
तसेच, शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले असून, मेहकर व लोणार मतदारसंघातील शेतकरी,
शेतमजूरवर्ग सद्या प्रचंड संतप्त आहेत. त्यांचा हा संताप आता मतदान यंत्रातूनच उफळून बाहेर येणार असल्याचेही डॉ. टाले म्हणाले.
डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्याविरोधात अफवा पसरविण्याचे काम काहीजण हेतुपुरस्सरपणे करत आहेत. परंतु, मायबाप जनतेला
सर्व वस्तुस्थिती माहिती असल्याने जनता त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवणार नाही. तरीदेखील विजयाची घोडदौड रोखण्यासाठी
विरोधकांकडून गैरसमज निर्माण करणाऱ्या अफवांच्या बातम्या पसरवल्या जाऊ शकतात, त्याला मेहकर व लोणार तालुक्यातील
नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केलेले आहे.

0 9 4 9 9 6
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *