त्या ‘संजयने’ या ‘संजयची’ डोकेदुखी वाढवू नये! – भाजपाच्या सारंग माळेकर यांचा इशारा ! – चिखलीतून गायकवाड यांचा अर्ज मागे न घेतल्यास मेहकर मध्ये संजय रायमुलकर यांना भाजपाच्या मतांपासून वंचित राहावे लागेल!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा  प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात लक्ष द्यावे .. इतर मतदारसंघात
लुडबुड करू नये .. बुलढाणा मतदारसंघातील संजय गायकवाड यांनी आपल्याच मतदारसंघात लक्ष केंद्रित करावे इतरत्र
डोकं लढवल्यास मेहकर मतदारसंघातील डॉ. संजय रायमुलकर यांना भाजपाच्या मतापासून वंचित राहावे लागेल, असे
भाजपाचे मेहकर तालुकाध्यक्ष सारंग प्रकाश माळेकर यांनी इशारा दिला आहे.
विद्यमान आमदार संजय गायकवाड शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपाचे लोकसभा
संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.या दोघांमध्ये राजकीय हाडवैर असून
शाब्दिक वादाच्या ठिणग्या पडत आहेत.असे असताना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांनी
चिखली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केलेली आहे. भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले ह्या तेथील प्रबळ
उमेदवार आहेत.परंतु कुणाल गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे त्यांना धक्का पोहोचू शकतो.शिवाय मेहकर विधानसभा
मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ संजय रायमुलकर निवडणूक लढवत आहे.दरम्यान मेहकर विधानसभा
मतदारसंघात देखील बुलढाणाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड लुडबुड करीत असल्याचा आरोप सारंग माळेकर
यांनी केला आहे.ते म्हणाले की, एक संजय दुसऱ्या संजयची डोकं दुखी ठरणार आहे.
प्रत्येक उमेदवाराने आपआपल्या मतदार संघात लक्ष द्यावे इतर मतदार संघात लुडबुड करू नये.संजय गायकवाड यांनी बुलडाणा मतदार संघात लक्ष केंद्रित करून विजयासाठी कशी पराकाष्ठा करता येईल याकडे
लक्ष द्यावे, इतर मतदार संघात डोकं घालू नये अन्यथा मेहकर मतदार संघात भाजपा चे उमेदवार संजय रायमुलकर यांचे
काम करणार नाही व त्याचा परिणाम येणाऱ्या 23 नोव्हेंबरला दिसून येईल. प्रत्येक उमेदवाराने
आपआपल्या मतदार संघातील ज्यांचे त्यांचे आपसी वाद हे आपल्या मतदार संघापूर्तेच मर्यादित ठेवावे अन्यथा त्याचा
परिणाम महायुतीला भोगावा लागू शकतो. चिखलीतून गायकवाड यांचा अर्ज मागे न घेतल्यास मेहकर मध्ये संजय
रायमुलकर यांना भाजपाच्या मातांपासून वंचित राहावे लागेल असेही
सारंग प्रकाश माळेकर म्हणाले.

0 9 4 9 9 9
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *