बुलडाण्यात २० लाखाची रोकड जप्त शहर पोलिसांची कारवाई

Khozmaster
1 Min Read

महाराष्ट्र राज्यात २०२४ ची विधान सभा निवडणूक सुरु असून जोरदार रणधुमाळी सुरू आहे. राज्यात निवडणूकीची २० नोव्हेंबरला निवडणुकीचे होऊ घातलेले मतदान होणार आहेत. तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळते. सध्या ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून, पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहे. याच संदर्भात बुलडाणा शहर पोलिसांनी बुलडाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासणी करताना टू-व्हिलर स्कुटीच्या डिक्कीतून २० लाखांची रोकड जप्त केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान तातडीने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली असून, संबधित व्यक्तीची चौकशी सुरू केली. २० लाख रूपये रोख घेऊन तो चिखली येथील व्यापाऱ्याकडे जात होतो असे त्याने पोलीसांना सांगितले. मात्र २० हजारापेक्षा अधिकची रोख रक्कमेची वाहतूक करण्यास मनाई असल्याचे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याची माहिती प्रोफेशनल डीवायएसपी वंदना कारखेले यांनी दिली.

0 9 4 9 9 9
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *