बुलडाणा : भय भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता
वैतागली आहे. बुलडाण्यात कायद्याचे राज्य नसून “काय घ्यायचे” एवढेच इथल्या
लोकप्रतिनिधींना कळते. उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी करून हे खोके घेऊन
पळाले त्यामुळे आता इथली जनता त्यांना पळवल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा
विधानसभा मतदारसंघात आता परिवर्तन होणार आणि २३ नोव्हेंबरला मशाल
पेटणार म्हणजे पेटणारच असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले. काल, ४
नोव्हेंबरला त्यांचा मोताळा तालुक्यातील शिरवा, परडा या गावांमध्ये प्रचार दौरा
संपन्न झाला. या दौऱ्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. ही परिवर्तनाची लाट आहे
अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.
बुलडाण्यात परिवर्तनाची लाट? जयश्रीताईंच्या गाव भेट दौऱ्यांना अभूतपूर्व प्रतिसाद; जयश्रीताई म्हणाल्या, भय, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता वैतागली ….
0
9
4
9
9
9
Users Today : 30
Leave a comment