सिंदखेड राजात भाजपचे मतदार संभ्रमात! मनोज कायंदे की डॉ. शशिकांत खेडेकर .. काम कुणाचे करायचे? आज बोलवली भाजपने बैठक! डॉ. शिंगणेंच्या पराभवासाठी एकमुखी निर्णय होणार …

Khozmaster
2 Min Read

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात
महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस मधून
आलेल्या मनोज कायंदेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी
अॅड. नाझेर काझी अट्टाहास धरला होता. यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत शिंदेंच्या
शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले डॉ. खेडेकर व मनोज कायंदे या दोघांपैकी
कुणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर
विरुद्ध मनोज कायंदे अशी ही लढत होणार आहे. दरम्यान महायुतीतील भाजपच्या
मतदारांमध्ये मात्र आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी
आणि शिंदेंची शिवसेना दोन्हीही मित्र पक्ष असल्याने भाजपने कुणाचे काम करायचे?
आणि शिंदेंची शिवसेना दोन्हीही मित्र पक्ष असल्याने भाजपने कुणाचे काम करायचे?
अशा कोंडीत इथली नेतेमंडळी सापडली आहेत . त्यावर तोडगा काढण्यासाठी आज
,५ नोव्हेंबर च्या दुपारी भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. त्या
बैठकीत यावर चर्चा करून कार्यकर्त्यांची म्हणणे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल
अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी दिली आहे. दरम्यान काही
झाले तरी डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करण्यासाठी जे काही योग्य असेल तो
निर्णय एकमुखी घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले ..
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीने खेळलेले राजकारण महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करणारे
यांच्या कुटनीतीला कुटनीतीनेच आणि जशास तसे उत्तर देण्याचा भाजपचा प्लॅन आहे.
हा अपवाद वगळला तर तब्बल २५ वर्षांपासून आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर
आहे. त्यामुळे विकासाचा अनुशेष, प्रस्थापित विरोधी लाट या मुद्यांचा सामना डॉ. राजेंद्र शिंगणे यांना करावा
लागणार आहे. २५ वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब घेऊनच डॉ.शिंगणे यांना मतदारांसमोर जावे लागणार आहे.
डॉ.शिंगणे यांना कडवे आव्हान देणाऱ्या उमेदवाराची बाजू घेण्याचा विचार भाजपच्या आजच्या बैठकीत मांडल्या
जाऊ शकतो.

0 9 5 0 0 2
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *