मेहकर मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटला महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचाराला सुरूवात

Khozmaster
2 Min Read

मेहकर : ‘परिवर्तनाचा वारकरी, जनसामान्यांचा सेवेकरी’ हे ब्रीद घेउन सिध्दार्थ खरात यांचा परिवर्तन दौरा मेहकर विधानसभा मतदारसंघातील गावन गाव पिंजून काढत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या प्रचार कार्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे.
प्राचाराच्या सुरुवातीला सिध्दार्थ खरात यांनी श्री शारंगधर बालाजी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पंच पीर बाबा दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन गावांचा प्रचार दौरा सुरू केला. दरम्यान, खरात यांनी पंचपीर बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. शेवटी श्री संत गजानन महाराज यांच्या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेऊन, महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून, गावभेट आणि परिवर्तन दौरा सुरू केला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, काँग्रेसचे विधानसभा नेते ॲड. अनंत वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दत्ता घनवट, तालुका अध्यक्ष काँग्रेस देवानंद पवार, नंदकिशोर बोरे, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नाजिमभाऊ कुरेशी, नारायण बळी, संजय वडतकर, वसंतराव देशमुख, ॲड. विजय मोरे, शैलेश बावस्कर, ॲड. गजानन लांडगे, सुखदेव ढाकरके, भागवत बोरकर, विनायक राव टाले, सतीश ताजने, छोटू गवळी, युनूस पटेल, रमजान चौधरी, बाबू परसुवाले तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 5 0 0 2
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *