देऊळगावराजा: डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विकास कामे करताना
कधीच जाती धर्माचा विचार केला नाही.आमदार असताना आणि नसतानाही त्यांनी जेवढी कामे
मुस्लिम समाज बांधवांसाठी केली तेवढी कुणीच केली नाही. डॉ. शशिकांत खेडेकर हे खऱ्या अर्थाने
विकासपुरुष आहे.विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहे.त्यामुळे मुस्लिम बांधवांची समर्थ साथ
डॉ. शशिकांत खेडेकर यांना मिळणार असून डॉ. शशिकांत खेडेकरच विजयी होणार असा विश्वास
शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिद्धिक कुरेशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त
केला आहे .डॉ. शशिकांत खेडेकर हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाने, मुस्लिम
वस्त्यांमधील पायाभूत सुविधा, अंतर्गत रस्ते यासह विविध कामांसाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून
दिला आहे. विद्यमान आमदारांचा केवळ मुस्लिम मतांवर डोळा आहे, मात्र मुस्लिम समाजाचे त्यांना काही देणे घेणे
नाही.त्यामुळे कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा हे मुस्लिम बांधवांना आता समजले आहे. त्यामुळे या निवडणुकीत
मुस्लिम समाज बांधव डॉ. शशिकांत खेडेकर यांना भरभरून मतदान करतील असा विश्वासही सिद्दीक कुरेशी यांनी
प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे. मतदारसंघातील तमाम जनतेने, सर्व जाती धर्माच्या समाजबांधवांनी विकासपुरुष
डॉ. शशिकांत खेडेकर यांनाच मतदान करावे असे आवाहनही सिद्धिक कुरेशी यांनी केले आहे .
डॉ. शशिकांत खेडेकर खऱ्या अर्थाने विकासपुरुष! त्यांनीच मुस्लिमबांधवांना न्याय दिला! सिद्धिक कुरेशी यांचे प्रतिपादन; म्हणाले, डॉ.शशिकांत खेडेकरच विजयी होणार …
0
9
5
0
0
2
Users Today : 33
Leave a comment