रायपूर सर्कलमध्ये घोंगावले श्वेताताईंच्या प्रचाराचे वादळ! व्यापक जनप्रतिसादातून श्वेताताईंना मताधिक्य मिळण्याची खात्री …..

Khozmaster
1 Min Read

चिखली : आपल्या विकासकार्यातून चिखली मतदारसंघाचे रूपडे
पालटण्याचा संकल्प केलेल्या व या संकल्पपूर्तीसाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेल्या भाजपा
महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या भेटीगाठी
दौऱ्याला ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्वेताताईंचे
गावकऱ्यांकडून स्वागत होत आहे. असेच चित्र ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या रायपूर जिल्हा परिषद
सर्कलमधील दौऱ्यात देखील पाहायला मिळाले. पांगरी, साखळी खुर्द, केसापूर, माळवंडी, दुधा,
चिखला घाटनांद्रा ढासाळवाडी पळसखेड आणि रायपूर येथे मिळालेल्या व्यापक जनप्रतिसादातून
या सर्कलमध्ये श्वेताताईंना मोठे मताधिक्य मिळणार असल्याची मनोमन खात्री पटली.
आपल्या पहिल्याच टर्ममध्ये पाच वर्षांपैकी पहिली आली अडीच वर्षे मविआच्या सरकारमुळे विकास निधी प्राप्त न झाल्याची उणीव
श्वेताताईंनी महायुतीचे सरकार आल्यानंतर कितीतरी अधिक पटीने भरून काढली. मागील अडीच वर्षात हजारो कोटी रुपयांचा
विकास निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणत शहर व ग्रामीण भागात “‘ न भूतो न भविष्यती * अशा प्रकारची विकास कामे
मार्गी लावली रायपूर सर्कलमध्ये देखील श्वेताताईंनी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अक्षरशः धडाका लावला. प्रत्येक गावामध्ये
रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सोयी स्थानिक गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि पाठपुरावा आ. महाले यांनी
केल्यामुळेच आज या परिसराचे चित्र पालटत असल्याचे दिसून येते.

0 9 5 0 0 8
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *