डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव मैदानात! देऊळगावराजा, सिंदखेडराजात प्रचारकार्यालयांचे उद्घाटन दणक्यात! ना.जाधव म्हणाले, मतदार संघाचा विकास करण्याची क्षमता डॉ. खेडेकरांतच ..

Khozmaster
1 Min Read

देऊळगावराजा : २०१४ ते २०१९ या पाच वर्षात सिंदखेडराजा

विधानसभा मतदारसंघासाठी जेवढा निधी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंजूर करून आणला तेवढा

आतापर्यंत कधीच आला नव्हता. आमदार नसताना सुद्धा डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट पाठपुरावा करून देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा शहरांसाठी

भरघोस निधी आणला. निधी कसा मंजूर करून आणायचा हे शशिकांत खेडेकर यांना चांगचे माहित

आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे.त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघाचा विकास करायचा

असेल तर डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यातच ती क्षमता आहे बाकीच्यांचा अनुभव आपण घेतला आहे ..

त्यामुळे शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी झपाट्याने कामाला लागा, दिवस रात्र एक करा आणि

२३ नोव्हेंबरला विजयाचा गुलाल उधळा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी केले.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या

देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा शहरातील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना.जाधव

यांच्या हस्ते काल,८ नोव्हेंबरच्या सायंकाळी झाले. यावेळी ना.जाधव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद

साधत प्रचारासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या …

0 9 5 0 0 8
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *