मनोज जरांगे यांचा बुलढाण्यातील कोणत्याही उमेदवारास पाठिंबा नाही!

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : मराठाआरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी बुलढाणा जिल्हयात कुठल्याही उमेदवारास पाठिंबा दिला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काही उमेदवार याबाबत संभ्रम निर्माण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सद्या विधानसभेचे वारे वाहत आहे. ठिकाणी उमेदवार उभे राहिले आहेत. मधल्या काळात उमेदवार करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. जे लोक मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील, समर्थन करतील अशांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे त्यांनी म्हंटले होते. मात्र प्राप्त राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे. व्यापक समाज हिताची भूमिका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणी स्टॅम्पवर प्रतिज्ञा लेख करून दिला व समर्थनाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करीत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आपल्याला पाठिंबा आहे असे कोणी म्हणत असले तरी अश्या उमेदवारांचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा कुठलाही अर्थार्थी संबंध राहणार नसल्याचे त्यांनीच अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. राजकीय भूमिका त्यांनी पूर्णतः मागे घेतली आहे.

0 9 5 0 1 2
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *