चिखली/बुलढाणा : यावर्षी चिखली विधानसभा निवडणुकीत महापशातून विविध पक्ष निवडणूक लढवणार असले, तरी खरी रस्सीखेच भाजपच्या उमेदवार श्वेता ताई महाले व काँग्रेसचे उमेदवार राहुल बोन्द्रे यांच्यातच होणार आहे, असे एकंदर विद्यमान राजकीय स्थितीवरून प्रकर्षाने जाणवते. मागील निवडणुकीवेळी जी राजकीय स्थिती महापशात होती, नेमकी तीच स्थिती यंदाही असेल. कारण मुख्य लढत त्याच दोन्ही पक्षांत आणि त्याच उमेदवारांत होत आहे. अशी राजकीय चर्चा गावागावात मतदार करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या आधी कधी बघितला नाही असा घनघोर रणसंग्राम या निवडणुकीत पाहलायला मिळणार आहे. मागील काळा मध्ये ज्या पद्धतीने महायुती सरकारने लाडकी बहीण, टोल माफी, गॅस, मोफत प्रवास असे अनेक निर्णय घेतले होते परंतु शेतकऱ्यांना सरसकट पीककर्ज माफी दिली नाही, शेत मालाला भाव दिला नाही.अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही, पिक विमा नाही त्यामुळे पुन्हा महायुतीला विधानसभा निवडणूक जिकणे पाहिजे तशी सोपी नाही. जनता विविध जाचक अटीमुळे चांगलीच पिचलेली आहे.
Users Today : 44