मेहकर : वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष शेतकरी क्रांतिकारी
संघटनेच्या अधिकृत उम्मेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा विधानसभा निवडणूकीच्या
अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. उच्च शिक्षित उम्मेदवार आणि विकासाचं विशिष्ट
व्हिजन असल्यामुळे डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांना समाजाच्या विविध स्तरावरून
लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक पसंती मिळत आहे. जनसामान्य जनता आपल्या हक्काचा उम्मेदवार
म्हणून डॉक्टर ऋशांक चव्हाण यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेचा
मुद्दा असो किंवा गाव, शहरातील आर्थिक विषमतेची दरी असो या प्रत्येक मुद्यावर त्यांनी आधीच
प्रकाश टाकला आहे.
दिनांक १३ नोव्हेंबरला त्यांनी गौढ़ाला, कंबरखेड, भालेगाव, पाचला, सावत्रा, सोनार गव्हाण, सूळा, कळंबेश्वर, थार, कासारखेड
या गावाला भेट दिली. यावेळी गावगाड्यातील जनतेंनी त्यांना मोठ्या मजबुतीने साथ देण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक गावातून त्यांना
भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरागत पक्षांची नक्कीच डोके दुखावणारी गोष्ट आहे. डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांचा
एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांच कडवं आव्हान उभं असेल.
डॉक्टर ऋतुजाताई चव्हाण यांना जनसामान्यांकडून मिळतोय प्रचंड प्रतिसाद!
0
9
5
0
3
5
Users Today : 66
Leave a comment