बुलडाणा :
बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक इकबाल चौक परिसरात मुस्लीम समाजातील नेते, पुढारी यांनी एक आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत युवक वर्गाची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
बुलडाणा विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, मुस्लीम समाज बांधवांचे विविध प्रश्न पोहचविण्यासाठी मुस्लीम समाजातील सामाजिक, राजकीय नेतेमंडळीनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन आज करण्यात आले.
बुलडाणा विधानसभा मतदार संघात मुस्लीम समाजाचा प्रभाव चांगला आहे. जयश्रीताई यांचा संपर्क बुलडाणा मतदार संघात चांगला आहे. त्यांची प्रत्येक समाजाशी नातेसंबंध असुन त्यांचाच फायदा त्यांना येणाऱ्या निवडणूकीत होणार आहे. सोबतच महिलांच्या प्रश्नासाठी त्या सदैव तत्पर असतात. प्रत्येक समाजातील महिलांना त्या परिचीत तर आहेच, सोबतच जयश्रीताई शेळके यांना मुस्लीम महिलांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी जयश्रीताई शेळके यांच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन मुस्लीम समाजातील नेत्यांनी केले आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 66