बुलडाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्रीताईंना सभागृहात पाठवा – माजी मंत्री एकनाथराव खडसे

Khozmaster
1 Min Read
बुलडाणा :
 बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आता माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील जनतेला आवाहन करून जयश्रीताईंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
     बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न धडाडीने सभागृहात मांडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना सभागृहात पाठवा असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
      बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे आपली शक्ती जयश्रीताईंच्या पाठीशी उभी करणार आहेत. एका व्हिडिओ संदेशात एकनाथराव खडसे यांनी जयश्रीताईंसाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

 

 

      जयश्रीताई संबंध बुलडाणा मतदार संघाला सुपरचित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे, मातृशक्तीला पाठबळ देण्यासाठी देखील जयश्री ताईंचे काम मोठे आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी जयश्रीताई शेळके यांच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
0 9 5 0 3 5
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *