बुलडाणा :
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यासाठी नारीशक्ती जोमाने कामाला लागली आहे. शहर, गाव- खेडे, वाडी- वस्तीवर प्रचारात महिला सक्रिय सहभाग घेतांना दिसत आहेत. मिळुनी सर्व आणू जयश्री’पर्व’ असा निर्धार मातृशक्तीने केला आहे. 

बुलडाणा विधानसभा मतदार संघात १४६८८२ महिला मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास अर्धी संख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत. तसे पाहिले तर निवडणुक प्रचार म्हटला की, पुरुष मंडळी आघाडीवर असतात. मात्र बुलडाणा विधानसभा मतदारसंघात यावेळी चित्र काहीसे वेगळे आहे. जयश्रीताईच्या प्रचारात पुरुषांच्या बरोबरीने म्हणा किंबहुना त्यांच्यापेक्षा महिला एक पाऊल पुढे दिसून येत आहेत. स्त्रिया, युवती प्रचाराची आघाडी सांभाळताना दिसून येत आहे. नात्यागोत्यासह सर्व समाजघटकांतील महिलांनी प्रचारात सहभाग घेतला आहे.
जबाबदारी आणि घरगुती कामांत गुंतून असलेल्या महिलांचा यंदा एवढा उत्साह का? याबाबत काही महिलांसोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावर “तब्बल ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रमुख राजकीय पक्षाकडून बुलडाण्यात महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला या संधीचे सोने करायचे आहे. यंदा आमचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचा आहे. त्याकरिता मिळुनी साऱ्या जणी कामाला लागल्या आहेत. तसेही बुलडाणा विधानसभा मतदार संघात सलग दुसऱ्यांदा आजपर्यंत कुणीच विजयी झालेले नाही, असा इतिहास आहे.” अशी प्रतिक्रिया मिळाली.
Users Today : 66