गुरुवार, १४ नोव्हेंबर
नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यामुळे या मतदारसंघात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
पेठ-सुरगाणा या आदिवासी मतदारसंघाच्या राजकारणात सुरुवातीला अपक्ष म्हणून उतरलेले हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते एकदा खासदार तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतही त्यांनी विविध पदे भूषवली. दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी आजारपणात ते एअर अँब्युलन्सने दिल्लीला गेले होते. भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाण यांना २०१९ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र तरी देखील ते पक्षासोबत एकनिष्ठ होते. हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भारती पवार यांचा तब्बल २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. नंतरच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने चव्हाण यांना उमेदवारी नाकारत भारती पवार भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यांनी या मतदार संघातून विजय मिळविला होता. तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती
माजी खासदार असलेल्या भाजपच्या बड्या दिग्गज नेत्यांच निधन
0
9
5
0
3
5
Users Today : 66
Leave a comment