प्रेमलता सोनोने यांचे प्रतिपादन; म्हणाल्या, मला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या उरात धडकी भरली …

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा
बदलण्याचे ध्येय मी समोर ठेवले आहे . मी प्रामाणिक ध्येयाने काम करणारी महिला आहे .
ध्येयाप्रती प्रामाणिक असल्याने सामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे . हा
प्रचंड प्रतिसादच माझ्या विजयाची खात्री आहे. मला मिळणारा प्रतिसाद पाहून
विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार
प्रेमलता सोनोने यांनी केले . बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलतांना प्रेमलता सोनोने म्हणाल्या की, मी विकासाची, व्यसनमुक्तीची, तरुणांच्या रोजगाराची, शेतकऱ्यांच्या
सिंचनाची लढाई लढण्यासाठी या निवडणूक रुपी युद्धात उतरले आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि त्याच पैशातून
पुन्हा पुन्हा सत्ता हे भारतीय लोकशाहीला लागलेले दृष्टचक्र संपले पाहिजे या मताची मी आहे असेही प्रेमलता सोनोने
म्हणाल्या. यावेळी त्यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात केवळ विकासाचा गाजावाजा केल्याचा दावा
केला. सौंदर्यीकरण आणि विकास या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचेही त्या म्हणाल्या. मतदारसंघातील शेकडो गावात
अजून नीट स्मशानभूमी नाही, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, गावा गावातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था
आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नाहीत.रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध होत नाही अशा
समस्यांचा पाढाही प्रेमलता सोनोने यांनी वाचला. या समस्या सोडवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक आहे .. मायबाप
जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल असेही प्रेमलता सोनोने म्हणाल्या.
२० नोव्हेंबरला सप्तकिरणांसह पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंतीही त्यांनी
केली.

0 9 5 0 4 7
Users Today : 78
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *