मी ५ वर्षांत जेवढी कामे केली तेवढी त्यांना २५ वर्षांत नाही जमली! डॉ. शशिकांत खेडेकरांचा डॉ. शिंगणेंवर हल्लाबोल; म्हणाले, यंदा मतदार संघाने परिवर्तनाचा निर्धार केलाय; विजय शिवसेनेचाच होणार…

Khozmaster
2 Min Read

देऊळगावराजा : मी ५ वर्षात जेवढी विकास कामे केली, जेवढा निधी मतदार संघात आणला तेव्हढा निधी त्यांनी २५ वर्षात देखील आणला नाही. त्यांनी मंत्री पदे भोगली पण मतदार संघाच्या समस्या जैसे थे ठेवल्या आता एवढ होऊनही ते म्हणतात की मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढू.. यांना जनाची नाही तर स्वतःची मनाची तरी… पण आता सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला आहे. मतदारसंघाची वाट लावणाऱ्यांना मतदारसंघातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.. या निवडणुकीत विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. शशिकांत खेडेकर यांनी “बुलडाणा लाइव्ह” शी बोलतांना दिली आहे.. यावेळी बोलताना डॉ. शशिकांत खेडेकर म्हणाले की, इथल्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघाची वाट लावण्याचे काम केले. २५ वर्षांत त्यांना साधे साधे प्रश्नही सोडविता आले नाही. सिंदखेड राजा सारखे जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ असताना देखील या माणसाला काही करता आले नाही. आमदार झाला की हा माणूस गायब होतो, डायरेक्ट निवडणुका आल्या तेव्हाच मतदारसंघात येतो. याउलट जनतेने ५ वर्षे संधी दिली तेव्हा २३०० कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून देऊळगाव राजा सिंदखेड राजा शहराच्या पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी आणला, त्यातील शेकडो कोटींची कामे आता प्रगतीपथावर आहेत. मतदारसंघातील जनतेला आता विद्यमान आमदारांचा कावा लक्षात आलेला आहे, त्यामुळे यावेळी त्यांचा सडकून पराभव होणार आहे. यावेळी सिंदखेडराजा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहेच असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला…

0 9 5 0 4 6
Users Today : 77
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *