चिखली : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. विद्यमान आमदार श्वेताताई यांनी प्रचार कालावधीत जोरदार प्रचार केला. आता याची अंतिम परिणिती मतदानाच्या माध्यमातून दिसणार आहे. महायुतीच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात ज्या गतीने आमदार श्वेताताईंनी विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली ते पाहता त्यांनाच पुन्हा आमदार करण्याचा निर्धार प्रचार कालावधीत गावोगावी अनेकांनी व्यक्त केला. अडीच वर्षांत विकासाचा फक्त ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे. चिखली विधानसभा मतदारसंघासाठी पुढच्या ५ वर्षांत खूप काही करायचं आहे. चिखली विधानसभा मतदार संघाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवायचे आहे अशी प्रतिक्रिया प्रचार कालावधी संपल्यानंतर आमदार श्वेताताईंनी माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या अडीच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांची कामे केली. आधीच्या दहा वर्षात एवढी कामे झाली नाहीत तेवढी अडीच वर्षांत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यासाठी खूप सहकार्य लाभले असे आ. श्वेताताई म्हणाल्या. पुढच्या ५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे तयार आहे. गाव तिथे अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा, मंजूर पांदन रस्ते पूर्ण करून भविष्यात त्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, सर्व गंभीर स्वरूपाच्या आजारांवर मोफत उपचार, वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा, चिखली येथे MRI व सिटीस्कॅनला मान्यता मिळवून देणे यासह खूप काही कामे पुढच्या पाच वर्षात करायची आहेत असे आ. श्वेताताई म्हणाल्या
श्वेताताईंचा शब्द मतदारांना भावतोय… २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्वेताताईंना चिखलीकर जनतेने भरभरून मतदान केले. सुरुवातीची अडीच वर्षे विरोधी पक्षात असताना देखील श्वेताताईंनी आक्रमक आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. कोविड काळात श्वेताताईनी केलेले काम चिखलीकर जनता विसरणार नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापल्यावर आमदार श्वेताताईंनी दिलेला लढा शेतकऱ्यांना आजही आठवतोय. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महायुतीच्या काळात आमदार श्वेताताईंनी हजारो कोटी रुपयांची विकास कामे मतदार संघात केली. विकास कामे करीत असताना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. जनतेच्या सुखदुःखातही त्या कायम सहभागी होतांना दिसल्या. त्यामुळे प्रचार कालावधीमध्ये आमदार श्वेताताईंनी दिलेला दिलेला शब्द मतदारांना भावला आहे..
हा फक्त ट्रेलर.. पिक्चर अभी बाकी है! पुढच्या ५ वर्षांत चिखली विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर पोहोचवणार! आ. श्वेताताईंचा शब्द चिखलीकरांना भावतोय…..
0
9
5
0
5
1
Users Today : 82
Leave a comment