सिध्दार्थ खरातांचा पराभव झाल्यास डॉ ऋतुजा चव्हाणांना मागासवर्गीय समाज कधीच माफ करणार नाही… पौर्णिमा संदिप गवई
मेहकर :- (अविनाश लाड)
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट निर्माण झालेली असल्याचे त्यांच्या काही चेले चपाट्यांना वाटत असले तरी उद्या दि.२० नोव्हेंबर रोजी मतदार राजा त्यांच्या पदरात मतांचे दान टाकणार आहे, की नाही की मग ते महाविकास आघाडीच्या सिध्दार्थ खरात यांना घेऊन पडणार याबाबत सद्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच सोयाबीन व कापसाचा भाव, शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेला पीकविमा, मतदारसंघाचा रखडलेला विकास या भोवती ही निवडणूक फिरली असून, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडितील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराने याप्रश्नी जोरदार आवाज उठविल्याने सत्ताधारी पक्षासमोर चांगल्याच अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या, तसेच महायुतीच्या विविध नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड.प्रकाश आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू तथा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती सभा झाल्यात. या सभांतून आरक्षण, शेतकरी प्रश्न, स्थानिक विकास या मुद्द्यांवर प्रखरपणे भाष्यही करण्यात आले. तर स्थानिक उमेदवारांनीही शेतकरी पीकविमा,कापूस व सोयाबीनचे भाव, शेतकऱ्यांची पिळवणूक,मतदारसंघाचा रखडलेला विकास आदी मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला चांगलेच अडचणीत आणले. त्यामुळे मतदारसंघात गावोगावी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेतलेल्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्यासारख्या उच्चशिक्षीत व स्थानिक नेतृत्वाला मतदार संधी देणार की त्या सिध्दार्थ खरात यांना घेऊन पडणार याबाबत सद्या राजकीय चर्चाना उधाण आलेले आहे. काल शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी एक व्हिडिओ जारी करून, मतदारांना सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेण्याचे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदारांनी त्यांना मतदान केले आणि त्यामुळे सिध्दार्थ खरात पराभूत झाले तरी चुकीचा संदेश मतदारसंघात जाईल,आणि मतदार डॉ ऋतुजा चव्हाण यांना कधीच माफ करणार नाहीत. मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवणारा उमेदवार जरी निवडला तरीही चुकीचा संदेश राज्यात जाईल.
त्याउलट तरूणाईला संधी दिली तर हे तरूणरक्त मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढेल. शिवाय, या नव्या तरूण नेतृत्वाला पाहून सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणी राजकारणात येण्याचे धाडसही करतील.ऋषांक चव्हाण यांची ही भूमिका मतदारसंघातील सर्वांनाच पटलेली आहे असे नाही त्यामुळे उद्या दि.२० नोव्हेंबर रोजी मतदार काय कौल देतात, याकडे आता मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्वांचे लक्ष लागून आहे.
Users Today : 82