राजा लाडकी बहिण योजना फसवी असून, या महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्र पवारांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणण्याचा संकल्प केला असून, ही योजना राज्यात सत्ता परिवर्तन करेल.. असा आशावाद विविध प्रचार रॅल्यांमधून आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची लाडकी लेक कु. लक्ष्मीताई व्यक्त करत आहे. सिं. राजा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारा साठी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रजनीताई तथा लेक लक्ष्मीताई रिंगणात उतरल्या आहेत. या दोघींच्या माध्यमातून शिंगणे साहेबांच्या मागे नारीशक्तीचा सहभाग जाणवत आहे.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांची तिसरी पिढी
लक्ष्मी राजेंद्र शिंगणे यांच्या रूपाने सध्या निवडणुकीचे मैदान गाजवत असतांना दिसत आहे, त्याचे कारण ही तसेच आहे. लक्ष्मी शिंगणेंचे वडील डॉ. राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीच्या वतीने सहाव्यांदा विधानसभा निवडणुक लढवीत आहे, त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे सर्व कार्यकर्ते मैदानात उतरले आहे त्यामुळे पाल्य म्हणून लक्ष्मी शिंगणे आपल्या आईसोबत संपूर्ण मतदारसंघातून काढत असून डोअर टू डोअर प्रचार त्यांनी सुरू केला आहे. सोबत महिला कार्यकत्यांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे.यामध्ये युवतींचा देखील सहभाग आहे, गेल्या पंचवीस वर्षात आपल्या वडिलांनी मतदार संघासाठी ज्या ज्या विकासाची कामे मार्गी लावली. त्याची माहिती देऊळगावमही येथे एका प्रचार रॅली संदर्भात बोलतांना सांगतिले. यावेळी रजनी शिंगणे, कल्याणी शिंगणे, सरपंच कमल शिंगणे, लक्ष्मी म्हस्के, सुनीता शिंगणे, सविता शिंगणे, शीतल शिंगणे, अनिता शिंगणे, सविता
सुभाष शिंगणे, छाया हिवाळे, रेखा शिंगणे, आशा शिंगणे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी रियाजखों पठाण, नितीन शिंगणे, गजेंद्र शिंगणे, उमेश शिंगणे, राम मस्के, गजानन चेके, रामभाऊ गुरुजी, गजेंद्र शिंगणे, निखिल शिंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नितीन शिंगणे, बी. एम पठाण, संभाजी शिंगणे, शंकर शिंगणे, संजय शिंगणे, रवींद्र इंगळे, वासुदेव शिंगणे, सुनील मोरे, मन्नान पठाण, आशिक महंमद, निसार शेख, सै. सईद, कृष्णा शिंगणे, अशोक पाबळे, भगवान जोशी, सुभाष शिंगणे, तेजराव शिंगणे, रामभाऊ शिंगणे, गणेश नागरे, भगवान शिंगणे, संजय शिंगणे, प्रशांत शिंगणे, बालूभाऊ शिंगणे, बळीराम शिंगणे, अशोक शिंगणे, एस. पालवे, राजेंद्र शिंगणे, चंद्रभान झिने, धर्मराज खिल्लारे, किशोर शिंगणे यासह महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 82