सिंदखेडराजा : विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार उभे असून 16 उमेदवार माझ्यावर आरोप करतात. एकमेकांवर काहीही बोलत नाही. जर मी काहीच केले नाही तर ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी कशी राहते! कारण जनता माझ्या पाठीशी आहे म्हणजेच मी विकासाची कामे केली म्हणून सोबत आहे. हे महायुतीचे सरकार तीन दिवसांचे सरकार आहे. असे उद्गार माजीमंत्री तथा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा येथील प्रचार सभेत काढले.
आजची प्रचार सभा ही शेवटची प्रचारसभा आहे. यानंतर दोन दिवस आपल्याला गावात राहून लक्ष द्यावे लागणार आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उभं राहून जास्तीतजास्त मतदान
करुन घ्यायचे आहे. गाफील राहू नका रात्र वैऱ्याची आहे. कारण महायुतीमधील भांडण संपलेले नाही. आज एक पत्र प्रसार माध्यमांवर झळकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा शिवसेना शिंदे गटाचे डॉ शशिकांत खेडेकर यांना आहे. यांच्यात काय कुरघोडी चालली हे जनतेच्या लक्षात आले आहे. महायुतीतून मी बाहेर पडलो. यांना रस्ता मोकळा करून दिला
परंतू शेवटच्या दिवसापर्यंत यांना महायुतीचा उमेदवार ठरवता आला नाही. अखेर मला पाडण्यासाठी दोन दोन उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरविले. त्यांच्यात पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे आणि मला येवढा पाठिंबा मिळाला आहे की त्या
ओझाने पाठ वाकली आहे. असो आज महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर कॉग्रेस, शिवसेना उवाठा, आरपीआय, यासह घटक पक्षांचे नेते सर्व उपस्थित आहेत. ज्यांना मी कधीच कमतरता भासू दिली नाही ते माझ्यावर आरोप करतात. माझ्यासाठी एक शेर नेहमी म्हटल्या जात होता.
“खुल्सओ मुहब्बत के मोती लुटाकर चलता है !
सभीको आपने गले से लगा कर चलता है !
करे भी क्या कोई उसके कद अंदाजा वो अस्मा है
मगर फिर भी सर झुकाके चलता है !
आज तो शेर सादर करताना ते कोणासाठी वापरतात हे आपण लक्षात घ्यायला हवे. आजची प्रचार सभा आणि रॅली पाहून कदाचित त्यांच्या मनात धडकी भरली असेल. आपली लढत कोणासोबत आहे.
Users Today : 82