लोकशाही अन संविधानाच्याबाजूने मतदान करा- जयश्रीताई शेळके मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद

Khozmaster
1 Min Read
बुलडाणा :पुढील पाच वर्षे आपल्या भविष्यासाठी महत्वाची असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विचार करुन लोकशाहीच्या, संविधानाच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास च्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले.
      आज सकाळी शहरातील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल बुथवर त्यांनी पती सुनील शेळके यांच्या समवेत मतदान केले. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. जयश्रीताई म्हणाल्या, ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. मी लोकशाहीच्या बाजूने मतदान केले याचा मला आनंद आहे. बुलडाण्यातील मतदार सुज्ञ आहे. त्यांनी योग्य निर्णय घेऊन मतदान करावे. मतदान हा पवित्र अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे. आज सुटी असल्याने काही नागरिक बाहेरगावी फिरायला जातात. त्यांनी तसे करु नये. आधी मतदानाचा हक्क बजावून मग दिवसभर सुटीचा आनंद घ्यावा. सकाळपासून सर्वत्र उत्साह असून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदारांनी भरभरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *