पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टि के व्ही चौकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. अकोला जिल्हा सेक्टर पेट्रोलिंग करत असताना, ठाणेदार शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने चौकात आकस्मिक नाकाबंदी केली, नाकाबंदी दरम्यान, वाहनांची तपासणी केली असता, वाहन क्रमांक MH 04 HF 7230 मध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारू आढळली. या वाहनामध्ये 31 पेट्या सेवन स्टार देशी दारू सापडल्या, ज्यांचा एकूण मूल्य 77,300 रुपये होता. याच्याबरोबर दोन मोबाईल (किंमत अंदाजे 25,000 रुपये) आणि एक क्रूझर गाडी (किंमत अंदाजे 70,000 रुपये) सुद्धा ताब्यात घेण्यात आते. एकूण 8,02500 रुपये किमतीचा मुद्देमात पोलिसांनी जप्त केला. कारवाईदरम्यान, जगदीश बाबुराव ताजने (वय 27, पिंपरडोली, पातुर) आणि अमित अशोक ताजने (वय 35, नवेगाव, पातुर) यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांवर कलम 65 (महाराष्ट्र दारूबंदी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.निवडणुकीदरम्यान दारूची वाहतूक करणान्यांना कडक कारवाईचे इशारे याव्यतिरिक्त, पोलिसांनी निवडणुकीदरम्यान दारूच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार शंकर शेळके यांनीदिला आहे. या प्रकारच्या घटनांमुळे आगामी निवडणुकीच्या शांततेसाठी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, याची पुरेशी काळजी घेतली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पातुर पोलिसांनी या कारवाईला मोठे यश मानले असून, आणखी तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
Users Today : 4