स्री सन्मान ‘ हे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे वैशिष्ट्य !* 52 वर्षानंतर जयश्रीताई शेळके यांच्या रूपाने महिलेलाच आमदार करण्याचा बुलडाणाकरांचा निश्चय …

Khozmaster
4 Min Read
बुलडाणा : राजकीय सामाजिक जीवनात फुले, शाहू, आंबेडकर यांना आराध्य दैवत मानत वाटचाल करणाऱ्या आणि राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,माता रमाई कन्या ही जयश्रीताई सुनील शेळके यांची ओळख. बुलडाणा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीच्या उमेदवार ही त्यांची आत्ताची ओळख. मात्र 23 नोव्हेंबर च्या संध्याकाळी बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या आमदार ही त्यांची नवीन ओळख निर्माण होणार आहे. याचे कारण बुलडाणा विधानसभा मतदार संघातील जिजाऊ सावित्री, रमाईच्या लेकींनी आणि पितृतुल्य ज्येष्ठ मतदार, भावानी देखील यंदा जयश्रीताईंना दणदणीत मतांच्या फरकाने विजयी करून बुलडाण्याच्या आमदार करण्याचा मनोमनी निर्धार करून चंगच बांधल्याचे चित्र मतदार संघात यंत्र, तंत्र, सर्वत्रच केल्याचे दिसून येत आहे.
      बुलडाणा शहरासह , बुलडाणा ,मोताळा तालुक्यातील गावागावात, खेडोपाड्यात या निर्धाराची मशाल पेटलीय. उच्चशिक्षित आणि विनम्र, संयमी पण तितकाच कणखर स्वभाव , त्यांचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याने लाखो मतदार प्रभावित झाल्याचे खेडोपाड्यात जाणवत आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघ तसाही पुरोगामी, सुसंस्कृत, उच्चशिक्षित मतदारांचा भरणा असलेला मतदार संघ आहे. कर्तृत्ववान महिलांचा आदर सन्मान करणारा आणि बुलडाणा शहरात ज्यांचे वास्तव्य झाले अश्या आध्य लेखिका ताराबाई शिंदे यांचा मतदार संघ आहे. राजकारणात पण बुलडाणा मतदार संघाने महिलांचा आदर राखून त्यांना मोठी पदे मिळवून दिली.

    संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर झालेल्या बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या इंदिराबाई कोटांबकर याना मतदार संघातीळ पुरुष,महिला मतदारांनी पाठबळ देत आमदार केले. 1967 च्या निवडणूक मध्ये इंदिराबाई कोटांबकर या पुन्हा आमदार झाल्या. यानंतर 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुमनताई शिवाजी पाटील आमदार झाल्या. सुमनताई घाटाखालील मोताळा तालुक्यातील होत्या.
* बुलडाणा मतदार संघाने स्री सन्मान वेळोवेळी केला :
      बुलडाणा मतदार संघातील समंजस पुरुष, महिला मतदारांनी स्त्री,पुरुष किंवा घाटाखालील किंवा घाटावरचा असा भेद भाव न करता महिला उमेदवारांना निवडून आमदार केले असा इतिहास आहे. यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील जयश्रीताई शेळकेंच्या रूपाने पुन्हा एक कर्तबगार, कर्तृत्ववान, उच्च शिक्षित, विकासाची दृष्टी असलेली महिला निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल 52 वर्षांपासून बुलडाणा मतदार संघाला महिला आमदार नसल्याने मतदारांना जयश्रीताई शेळके यांच्याबद्धल प्रचंड सहानुभूती आहे. ही सहानुभूतीची लाट संपूर्ण मतदार संघात पसरली असून त्याच बरोबर राजकीय परिवर्तनाची त्सुनामी लाटही मतदार संघात तयार झाली आहे. तसेच लाखो सुशिक्षित, बुद्धिजीवी, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी, शांतता प्रेमी, कायदा प्रेमी मतदारांना बुलडाणा मतदारसंघ पूर्वीसारखा शांत, सुसंस्कृत हवा आहे. बुलडाणा शहर आणि मतदारसंघ बिहार उत्तरप्रदेश होणे पसंत नाही. तो गुन्हेगार , अवैध व्यावसायिक, टपोरी मंडळींचा नको आहे. विकास पाहिजे पण हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, दहशत असलेला नको आहे. यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता असलेल्या दहशतीचे साम्राज्य संपुष्टात आणण्याची गुंडगिरी तडीपार करण्याची क्षमता असलेल्या जयश्री ताई शेळके यांच्या विजयाचा निर्धार, त्यांना आमदार करण्याचा संकल्प लाखो मतदारांनी यासाठी केला आहे. जयश्रीताई देखील यासाठी कटिबद्ध असून महिला असून दहशत, गुंडाराज विरुद्ध लढा देत आहे. जिजाऊ ,रमाई, सावित्रीच्या या लेकीला एकवेळ संधी द्या, तुम्हाला पश्चाताप होणार नाही, संधीचे सोनेच करेल असे सांगतात. त्यांचे हे विनम्र आवाहन बुलडाणा मतदार संघातील लाखो मतदारांना भावले आहे. यामुळे 23 तारखेला बुलडाण्याच्या आमदार ही जयश्रीताई शेळके यांची नवीन ओळख तयार होणार हे नक्की…..
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *