बुलडाणा:-(जिल्हा विशेष प्रतिनिधी)
बुलडाणा विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवार
जयश्री सुनिल शेळके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे लेखी निवेदन दिले त्यामध्ये त्यांनी २२ बुलडाणा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली आहे.उद्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होणार आहे.महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार, त्यांचे कुटुंबिय आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच माझ्या समर्थकांना अनेक वेळा धमक्या दिल्या त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदानानंतर दोन दिवसांपासून सातत्याने महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांचे कुटुंबिय व त्यांच्या नजिकच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना हातपाय तोडू, जिवे मारु,बघून घेऊ अशा प्रकारच्या धमक्या देवुन दबाव टाकण्याचा आणि दहशत पसरविण्याचा प्रकार होत आहे.
उद्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अनपेक्षित निकाल लागल्यानंतर महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिक स्थिती ढासाळून मोठ्या प्रमाणात दहशत माजविण्याचे,
मारहाणीचे प्रकार घडू शकतात.बुलडाणा विधानसभा मतदार संघामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी तसेच महायुतीच्या उमेदवाराची याआधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेता बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा शहर,डोंगखंडाळा, देऊळघाट तसेच मोताळा तालुक्यातील मोताळा शहर धामणगाव बढे,रोहिणखेड यासह इतर संवेदनशील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करुन महायुतीचे उमेदवार व त्यांच्या नजिकच्या लोकांवर कडक नजर ठेवण्यात यावी.तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी. त्याचबरोबर मतमोजणी कक्ष आणि मतमोजणीच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त आणि सिसिटीव्ही असावेत.
या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास बुलडाणा विधानसभा मतदार संघात शांतता व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे नमूद करण्यात आले असून निवेदनावर आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार धृपतराव सावळे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री सुनिल शेळके, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय अंभोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश शेळके,उबाठाचे तालुकाप्रमुख लखन गाडेकर,भाराकॉंच्या महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.मिनलताई आंबेकर,भाराकॉंच्या महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव सौ. नंदिनीताई टारपे,उबाठाचे जिल्हा संघटक प्रा.डि.एस. लहाने,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा महासचिव वि.हि.जाधव,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस,
व महिला पदाधिकारी उज्जला काळवाघे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तरी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे….