बुलडाणा:-(शाहिद शाहा)
सत्तेच्या नावाखाली शहर, ग्रामीण भागात गुंडशाही फोफावली आहे.धाक,धमकीच्या बळावर मनमानी सुरु आहे.शांतताप्रिय नागरिक या प्रकाराला कंटाळले आहेत. लोकशाहीत मतदार हा राजा असतो आणि हा मतदारराजा पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केला.यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.आज २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर जयश्रीताई शेळके यांनी आपल्याला विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचे म्हटले आहे.यावर्षीची निवडणूक परिवर्तनाची ठरणार आहे.एकीकडे विरोधकांची गुंडशाही,मनी,मसल पॉवर तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुसंस्कृतपणा व जनकल्याणाचा विचार आहे.येणारा काळ गंभीर संकट घेऊन येणारा असणार आहे.या संकटांशी दोन हात करण्यासाठी आपणास एकीची वज्रमुठं आवळावी लागणार आहे.बुलडाण्याची जनता खंबीरपणे आपल्यासोबत असल्याचा विश्वास जयश्रीताईंनी व्यक्त केला आहे.आज जल्लोष असणार आहे.जनतेचा कौल आदराने साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.