काही व्यक्ती मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत विनाकारण उभ्या असलेल्या सुवर्णा सालके यांना दिसल्या म्हणून त्यांनी त्या व्यक्तींना बाजूला सरकण्याचे आवाहन केले त्यावेळी अभिषेक हा तुम्ही आम्हाला कोण सांगणार ? असे म्हणत तिथे आला व सुवर्णा यांना धक्काबुक्की करत अभिषेक याने उमेश भांबरकर यांना मित्रांसोबत मारहाण केली आणि ‘ मतदानाचा निकाल लागू दे तुला पाहून घेतो ‘ अशी धमकी दिली. पन्नास जणांचे टोळके तिथे होते आणि पोलीस देखील त्यांच्यासमोर हतबल होते असे सुवर्णा सालके यांनी म्हटलेले आहे. संग्राम जगताप यांच्या कार्यालयाने मात्र आरोपी आपल्याशी संबंधित असल्याचा दावा फेटाळलेला आहे.
Users Today : 8