आमदार संजय गायकवाड म्हणतात .. ‘काही मित्र पक्षांनी साथ दिली नाही, निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो!’ -‘अपेक्षित मते पडू शकली नाहीत; हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित!’

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला
आहे.परंतु हा विजय निसटता होता त्यामुळे ते म्हणाले की, ‘अपेक्षित मते पडू शकली नाहीत पण हा विजय कार्यकर्त्याना
समर्पित आहे.’ दरम्यान काही मित्र पक्षांनी साथ दिली नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
आमदार गायकवाड यांनी विजय प्राप्त केल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, मी जनतेच्या सेवेसाठी संघर्ष करत आहो.
लोकांसाठी झटत असतांना व प्रचंड विकास कामे केली असताना अपेक्षीत मते पडू शकली नाही.लोकांना नेमकं काय
हवं? हा यामुळे प्रश्न पडतो. तरी सुध्दा 91 हजारावर मतदारांनी आपल्याला विक्रमी पसंती दर्शवली. त्याबद्दल मतदारांचा
मी ऋणी आहे. ही निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो.
काही ठिकाणी मित्रपक्षही सोबत नव्हते. काही नेत्यांनी विरोधात काम केले. 35 ते 40 वर्ष काम करून कोणी येऊन
पैश्याच्या
जोरावर निवडणूक लढवत असेलतर मग
सामान्य कार्यकर्त्याने काय करावं? हा
प्रश्न मला पडला आहे. राज्यात सरकार येत असतांना इथे पराभव झाला असतातर
विकासाचा बट्याबोळ झाला असता. पण
थोड्या मतांनी का होईना, विजय हा विजय असतो … तो कार्यकर्त्याना समर्पित करतो,
असे आ.संजय गायकवाड यांनी म्हटले.

0 9 5 0 5 9
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *