विद्यालयामध्ये मैदानी खेळ व संगणक शिक्षणाचा बटट्याबोळ

Khozmaster
2 Min Read

चिखली  :- तालुक्यातील मेरा बु येथे एकमेव श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय असल्याने 5 वी ते 12 वी पर्यत शिक्षण घेण्यासाठी आजू बाजूच्या खेड्यातील मुले मुली येतात. परंतु या विद्यालयामध्ये विद्यार्थीना मैदानी खेळासाठी कुठेही जागा नाही त्याच बरोबर संगणक (Computers)असून सुध्दा विद्यार्थीना शिक्षण दिल्या जातं नसल्याने या विद्यालयात मैदानी खेळ व संगणक शिक्षणाचा बटट्याबोळ झाल्याने विद्यार्थी व पालकामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

विद्यार्थी व पालकामध्ये नाराजीचे वातावरण

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयामार्फत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर वयोगटांनुसार मुला-मुलींसाठी वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल लाभ दिला जातो. तसेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा विद्यार्थ्यांना २५ गुणही दिले जातात. शासकीय नोकऱ्यांमध्येही या विद्यार्थ्यांना आरक्षण व प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील संगणक शिक्षण हा अल्पकालीन आनंद आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉर्पोरेट शाळांच्या समकक्षांसह समान खेळाचे मैदान देण्यासाठी सरकारने शाळां (School) मध्ये संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या विद्यालयात शाळा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार सुरु असल्याने विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण मृगजळ बनले आहे.

प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार सुरु असल्याने विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण मृगजळ बनले

विद्यार्थीसाठी कुठेही मैदान (ground)उपलब्ध नसल्याने क्रीडा स्पर्धांमधून या शाळांमधील विद्यार्थ्यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी विविध लाभापासून वंचित राहत असल्याने विद्यार्थी व पालकामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून गावाकऱ्याचे या शाळा प्रशासनाच्या मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे नव्याने रुजू झालेले नवीन प्राचार्य हे काहीतरी बदल घडवतील अशी पालकाना अपेक्षा होती परंतु दिवसेंदिवस शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असे चित्र उमटले आहे.

0 9 5 0 6 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *