धाड येथे दंगलसदृश्य परिस्थिती !! दगडफेक व जाळपोळ ; दोन गटात राडा! टिपू सुलतान यांच्या मिरवणुकी दरम्यान फटाके उडवण्यावरुन पेटली दंगल?

Khozmaster
1 Min Read
बुलढाणा :-(जिल्हा प्रतिनिधी) 
धाड येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापही या दंगलीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही गटांतील काही नागरिक प्रयत्न करत आहे.टिपू सुलतान यांच्या
मिरवणुकी दरम्यान फटाके उडवण्यावरुन दोन गटांमध्ये वाद पेटला असून वादाचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळ करण्यात झाले आहे.अलीकडे क्षूल्लक कारणावरुन मारहाणीच्या घटना घडत आहेत.परंतु धाड येथे टिपू सुलतान यांची मिरवणूक काढताना
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि वाद उफाळून आला.दोन गट आमने-सामने ठाकले असून, प्रचंड राडा
झाला.दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली.वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे.ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस दलांचा घटनास्थळी पोहोचले असून पोलिस प्रशासनाचा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या सुरु आहे.
One attachment • Scanned by Gmail

0 9 5 0 6 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *