संजय रायमुलकर यांना ओव्हरकॉन्फिडन्स नडला…. यांनी अभ्यास खरातांचा केला,परीक्षेत आशिष रहाटे आला… संजय रायमुलकर यांना ओव्हरकॉन्फिडन्स नडला..

Khozmaster
2 Min Read

स्वतः बरोबरच ऋषी जाधव यांना ही या निवडणुकीत आशिष रहाटे हा लोकप्रिय स्पर्धक तयार केला.

मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय रायमुलकर यांचा विजय निश्चित मानला जात होता परंतु संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येवूनही संजय रायमुलकर यांच्या हातात मात्र भोपळा आला.जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात सुरक्षित मानला जात असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघ काही गोष्टींची “अति” केल्यामुळे संजय रायमुलकर व शिवसेना शिंदे गटाने हातचा गमावला.

सिद्धार्थ खरात मतदारसंघांमध्ये अगदी नवखे आहेत या गोष्टीमुळे अगदी आरामात बसलेले संजय रायमुलकर यांनी सिद्धार्थ खरात यांच्या शेजारी बसलेले प्राध्यापक आशिष रहाटे यांच्याकडे लक्ष दिले नाही. सिद्धार्थ खरात यांना कमी लेखण्याच्या नादात ऋषी जाधव यांची राजकीय कारकीर्द पाण्यात जाईल याची पुरेपूर व्यवस्था संजय रायमुळकर आणी त्यांचे “कॅटलीपेक्षा चहा गरम” असे अधिनस्त यांनी करून ठेवली आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघ खुला व सर्वसाधारण होईल त्यावेळेस आशिष रहाटे हे ऋषी जाधव यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय उमेदवार असतील ही बाब मेहकर विधानसभा मतदारसंघातील लोकांनी नजरेत आणून दिली आहे.

आमदार सिद्धार्थ खरात यांना नवखे समजून,हे नेमके पक्षात आलेत इथपासून तर पक्षातील इतर जण त्यांच्या विरोधात उभे राहतील,मराठा व इतर समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत,वंचित ची सीट उभी केली की त्यांच्या समाजाची मते ही त्यांना मिळणार नाहीत,वरून रविकांत तुपकरांचा वंचितला पाठिंबा म्हणजे शेतकऱ्यांची मते ही त्यांना मिळणार नाहीत,त्यामुळे रायमुलकर हे 70 हजाराच्या लीडने सहज निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात होता.

या फाजील आत्मविश्वासाच्या पायी आमदार संजय रायमुलकर व त्यांच्या अधिक गरम असलेल्या टीमने माध्यम प्रतिनिधींनाही अगदी तुच्छ वागणूक दिली.याउलट आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतःच्या विरोधात लिहत असलेल्या माध्यम प्रतिनिधींशीही योग्य प्रकारेे समन्वय साधून,आशिष रहाटे यांचा जोश व शाम उमाळकर यांचा अनुभव सोबत घेतला आणी माजी मंत्री सुबोध सावजी यांना देखील आपल्या टीम मध्ये सामील करून घेतले.शेवटी ज्यांचा गेम करायचा त्यांच्याकडूनच गेम झाल्यावर जाग आली.आता पराभव पचवणे जरा कठीणच आहे त्यामुळे भांडण तंटे होणारच आहे.पण भांडण तंट्या पेक्षा आत्मपरीक्षण करता आले तर कदाचित पुन्हा उभे राहण्यासाठी बळ निर्माण होईल.पण आ. सिद्धार्थ खरात यांच्या या विजयाने माजी आ. संजय रायमुळकर यांचे राजकीय आयुष्य जवळजवळ संपुष्टात आलेले असून,ऋषी जाधव यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीवर देखील टांगती तलवार आली आहे.

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *