5 डिसेंबरला शपथविधी; कार्यकर्त्यांसह स्थानिकांमध्ये उत्सुकता
: राज्यात महायुतीला बहुमत प्राप्त झालेले आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील
महायुतीमधील सर्वच आमदार मंत्रिपदाच्या दावेदारीत असून महायुती सरकारमध्ये पहिल्या टप्यात बुलढाणा जिल्ह्यातून कोणा कोणाला मंत्रिपदाची लॉटरी
लागणार? याची जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुती सरकार
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जनतेने भरभरून कौल दिला आहे. भाजप एकट्या ताकदीवर सरकार बनवण्याच्या जवळपास पोहोचला आहे. मात्र एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊनच महायुतीचे नवीन सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपच्या जागा वाढल्याने शिंदे व पवार यांच्या वाट्याला किती व कोणती मंत्रिपदे येणार? तसेच भाजप स्वतःकडे किती व कोणती मंत्रिपदे ठेवणार? याचीही उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपकडे हे पद जाणार व देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट आहे. महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्याने आता युतीतील आमदारांचे मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीला जोरदार यश मिळाले आहे. जिल्ह्यात भाजपचे चार व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एक तर अजित पवार यांच्या गटाचा एक आमदार आहेत. या सर्वच आमदारांनी मंत्रिपदावर दावा सांगितला आहे.
जळगाव जामोद
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार मावळत्या सरकारमध्ये कामगार मंत्री व पालकमंत्री होते. त्यांनी आता मंत्री मंडळातील आपले स्थान टिकवण्यासाठी व चांगल्या खात्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. खामगावचे भाजपा आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी विजयाची हॅट्रिक साधल्याने तेही प्रबळ दावेदार आहेत. तिकडे मलकापूर विधानसभा मतदार संघात चायनसुख संचेती हे सहाव्यांदा आमदारकीची शपथ घेणार असल्याने दावेदारीच्या यादीत हेही आहेत. देवेन्द्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता महाले यांनी चिखलीतून दुसऱ्यांदा विजयी पताका रोखल्याने महिला म्हणून त्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. शिंदे गटाचे एकमेव आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या पक्षकाडून एकमेव दावेदार आहेत.
महामंडळाचे लाभार्थी कोण?
बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे सहा पैकी पाच आमदार मंत्रिपदाचे दावेदार आहेत, त्यांच्या समर्थकांचीही तशी मागणी आहे. मात्र डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर
आणि श्वेता महाले हे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील कोणाला आणि कोणते मंत्रिपद मिळते ? याची उत्सुकता आहे. ज्यांना मंत्रिपदे मिळणार
नाहीत असे आमदार व महायुतीतील घटक पक्षाचे जिल्ह्यातील नेते यांची वर्णी विविध महामंडळांवर लागण्याची शक्यता आहे. मंत्रिपद व महामंडळाचे लाभार्थी
कोण ठरणार? हे येत्याकाळात समजेल.
Users Today : 13