साखरखर्डा/सिंदखेडराजा -: बुलढाणा जिल्ह्यात वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा
जिजामाता सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरु होणार असे छातीठोकपणे
सांगत कारखाना खासगी कंपनीला विकण्यात आला. परंतु, कारखाना पूर्ववत सुरू
करण्याऐवजी तो मोडतोड करून भंगारात विक्री केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
मोडतोडकरण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नव्हे तर जिल्ह्याची
अस्मिता धोक्यात आली आहे. या अस्मितेला कोण वाचविणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान,
हा कारखाना भंगारात जाऊ नये, यासाठी शेतकरी व शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत
असल्याची माहिती हाती आली आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दुसरबीड येथे सहकार महर्षी
स्व. अण्णासाहेब देशमुख यांनी १९६७ साली सहकाराची मुहूर्तमेढ रोवतांना सहकाराच्या माध्यमातून
विदर्भात सर्वात प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने जिजामाता
सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. सहकार क्षेत्रात त्यांचे काम
चांगले असल्यामुळे त्यांना कारखाना उभारणीला राज्यातील सहकार लॉबीचे सहकार्य
मिळाले. कारखाना उभा झाला. या भागातील बागायतदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
दिलासा मिळाला. ऊसाला चांगला भाव मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना
आर्थिक मदत मिळू लागली. कारखाना १९९० पर्यंत व्यवस्थित चालला. राजकारण
कारखाना आर्थिक डबघाईस आला. तो पुन्हा उभा राहावा म्हणून सहकारमहर्षी
स्व.भास्करराव शिंगणे यांनी मदत केली. पुन्हा कारखाना सुरू झाला. त्यावर प्रशासक
आले. पुन्हा कारखाना अडचणीत आला. त्यातून सावरण्यासाठी आमदार डॉ. राजेंद्र
शिंगणे यांनी प्रयत्न केले. कारखाना सुरु झाला. पण कामगार संघटना आंदोलन करु
लागली आणि शेवटी कारखाना एकदाचा बंद झाला. तो शासनाने विक्रीला काढला.
तत्कालीन विधान परिषद सदस्य आमदार बबनराव चौधरी यांनी विकत घेतला. त्यावेळी
साखर कारखाना मोडतोड करून किंवा पूर्ववत सुरु करण्यात यावा, अशी अट होती.
परंतु, मोडतोड करून कारखाना विक्रीला या भागातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला.
कारखाण्याची डील रद्द झाली. त्यानंतर जालन्याच्या कोठारीला कारखाना विकला होता,
त्यांनी बरेच भंगार विकून टाकले. त्यांनीही कारखाना इतरत्र हलविण्यासाठी खटाटोप केला.
कारखाना मोडतोड करून भंगारात विकून जमीन विक्रीचा व्यवसाय सुरू झाला आहे. कारखाना
पूर्ववत आहे त्याच ठिकाणी सुरू झाला नाही तर शेतकरी संघटना आंदोलन करेल.
– वामनराव जाधव, शेतकरी संघटनेचे नेते, सिंदखेडराजा
परंतु, कारखाना आहे त्याच ठिकाणी सुरू राहिला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी एकजुट दाखविली. शेवटी सरकारने पुन्हा कारखाना ताब्यात घेतला. तीन वर्षांपूर्वी पुन्हा हा कारखाना
नगरच्या व्यंकटेश शुगर या कंपनीला विकला. त्यांनी हा कारखाना येथे सुरू करण्याचा माणस केला सर्वांना आनंद झाला दुसऱ्यावर्षी ऊस लागवडी केली, आनंद झाला. आता कात
टाकून कारखाना सुरू होणार अशी आशा पल्लवित झाली. यावर्षी कारखान्याचे काम करण्याचा ठेका ही दिला. परंतु दोन महिन्यापूर्वी तेही काम बंद केले, आता परत या
कारखान्याचे मोडतोडीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. बरेच भंगारही दररोज विकले जात आहे. परिसरात याबाबत तीव्र असंतोष आहे. कारखाना सुरू व्हावा यासाठी
दुसरबीडच्या शेतकऱ्यांनी नाममात्र किंमतीत जमीन दिल्या ११० रुपये एकर प्रमाणे १७० एकर जमीन दिली. या कारखान्याच्या ताब्यात असलेली १०० एकर जमीन विकून राहिलेल्या
७० एकर क्षेत्रावर पुन्हा साखर कारखाना उभा करण्याचा मनोदय एका हितचिंतकांनी व्यक्त केला. परंतु, हा कारखाना विकून जमिनी विकल्या गेल्या तर दानशूर शेतकरी गप्प
बसणार नाही. कारखाना सुरू करण्यापेक्षा जमिनी मोकळ्या करणे हाच मानस या कंपनीचा दिसतो. चौकशी केली असता आम्हाला नवीन कारखाना उभा करायचा असे सांगितले
जात आहे. त्या अगोदर हा कारखाना भंगारात विक्री करणे सुरू आहे. नवीन कारखाना को-जनरेशन, डिस्टलरी असे उद्योग सुरू करायचे असे जबाबदार व्यक्तींनी सांगितले, जर
तुमचा हेतू प्रमाणे असेल तर अगोदर नवीन कारखान्याचे काम सुरू करावे नंतरच या कारखान्याला हात लावा. या भागातील कारखाना अशा प्रकारे नामशेष होत असेल तर शेतकरी,
ऊस उत्पादक, व्यापारी, जमीन मालक गप्प बसणार नाही. तरी तुम्हाला नेमके काय करायचे हे जनतेसमोर आले पाहिजेत, अन्यथा या ठिकाणी मोठे जनआंदोलन उभे राहील, असा
इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
Users Today : 13