चिखली : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथून एक खळबळजनक
बातमी समोर आली आहे. येथे आकाशातून एक कोरियन यंत्र पडले आहेत .. एका मोठ्या फुग्याला
बांधलेले हे यंत्र आहे …
अंचरवाडी येथील शेतकरी संजय सिताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे. आज २ डिसेंबरला सकाळी संजय परिहार यांचा
मुलगा अविनाश परिहार आणि चुलत भाऊ वैभव परिहार हे शेतात गेले असता त्यांना हे यंत्र दिसले. त्यांनी तशी माहिती “बुलडाणा
लाइव्ह”ला दिली आहे. दरम्यान हे यंत्र नेमके कशाचे आहे? याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही .. मात्र यंत्रावर कोरियन
भाषेतील मजकूर असून या यंत्रांची निर्मिती कोरिया मध्ये झाल्याचा उल्लेख आहे … दरम्यान अद्याप पोलीस प्रशासन किंवा महसूल
प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले नाहीत …
अंचरवाडीत आकाशातून पडलं “साउथ कोरियन” यंत्र? नागरिकांमध्ये खळबळ …
0
6
2
5
8
2
Users Today : 218
Leave a comment