कुरघोडी! ‘आता फक्त कमळच!’ या ‘कमळावर’च्या बॅनरने त्या ‘धनुष्यबाणा’ला डिवचले!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा :- “राजतिलक की करो तैय्यारी,आ रहे है भगवाधारी!” या शिर्षकाखाली ना.फडणवीस यांचे
भावी मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण सोहळ्या पूर्वीच कारंजा चौकात झळकविण्यात आलेले विजयराज शिंदे यांचे
अभिनंदनपर बॅनर आ.संजय गायकवाड यांना मात्र डिवचणारे ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्याचे
कारण असे की, इतर महायुतीतील यशस्वी उमेदवारांचे बॅनरवर फोटो असून आमदार गायकवाड यांचा फोटो मात्र
टाळण्यात आला आहे.
भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे व शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांचे हाडवैर
प्रत्येकाला माहित आहे. त्यांच्यात कधी वाद पेटेल नवल राहिलेले नाही. परंतु परस्परांची कुरघोडी मात्र सातत्याने दिसून
येते.यंदाचे विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही कुरघोडी दिसून आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी भाजपाकडे
मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली होती. दरम्यान आमदार गायकवाड यांच्या मुलाने दबाव म्हणून चिखलीतून
भाजप उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज भरला होता.परंतु असे काही झाले नाही, चिखली कमळ फुलले तर बुलढाण्यात
धनुष्यबाण निशाण्यावर लागला.दरम्यान मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार की आणखी कोणी, हे अद्याप
गुलदस्त्यात असले तरी, येथील कारंजा चौकात माजी आमदार भाजपाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजयराज शिंदे यांनी
‘भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांना शपथविधी सोहळ्याच्या अपूर्व शुभेच्छा देणारे बॅनर झळकवले आहे.
या बॅनरवर महायुतीतील आ. संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले, चैनसुख संचेती, मनोज कायंदे या यशस्वी
उमेदवारांचे फोटो प्रसिद्ध करून अभिनंदन करण्यात आले असून आमदार संजय गायकवाड यांना मात्र फोटो सहित
वगळण्यात आले आहे.बॅनर वर ‘आता फक्त कमळ’ असेही उल्लेखित केले आहे.

0 9 5 0 6 6
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *