बुलडाणा :- जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यामाने गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह गीत, कविता लेखन, कथालेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व विज्ञान मेळावा (समूह व वैयक्तिक) युथ आयकॉन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यातील समूह लोकनृत्यासाठी प्रथम बक्षीस ७००० रुपये, द्वितीय ५००० रुपये व तृतीय ३००० रुपये, समूह लोकगीतासाठी प्रथम बक्षीस ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये व तृतीय २५०० रुपये, कविता लेखन व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेकरीता प्रथम बक्षीस २५०० रुपये, द्वितीय १५०० रुपये व तृतीय १००० रुपये, कथा लेखनासाठी प्रथम बक्षीस ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये व तृतीय १५०० रुपये, चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये व तृतीय २००० रुपये, वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५००० रुपये, द्वितीय २५०० रुपये व तृतीय १५०० रुपये, विज्ञान मेळाव्यासाठी (समूह) प्रथम बक्षीस ७००० रुपये, द्वितीय ५००० रुपये व तृतीय ३००० रुपये व विज्ञान मेळाव्यासाठी (वैयक्तिक) प्रथम बक्षीस ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये व तृतीय १५०० रुपये या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. यामधील विज्ञान मेळावा ही स्पर्धा राजर्षि शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात युवक- युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र, बुलडाणातर्फे करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार (९९७०११८७९७) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .
५ डिसेंबरला बुलडाण्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन
0
9
5
0
6
6
Users Today : 14
Leave a comment