सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा! आ. श्वेताताई महालेंचे आवाहन; उद्या बुलडाण्यात आक्रोश- न्याय मोर्चा…

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा : बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या
अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे, आज आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे, त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चात हिंदू बांधवांनी हजारांच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *