बुलढाणा ( शाहिद शहा ):-
जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटूंबासाठी पत्रकार भवनात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व आद्य संपादिका तनुचाई बिरजे यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत बढ़ें पांची नियुक्तो झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिला शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते शिचिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितीत डॉक्टरांविषयी माहिती दिली. पत्रकारांनी धकाधकीच्या जीवनात बातमी करतांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत मासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी सांगितले की, पत्रकारांसाठी आरोग्याविषयक सोधीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. डेंटल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश जतकर यांनी दातांच्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितले की, दातांच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते परंतु त्यामुळे एखादा आजार बळावू शकतो डॉ. सौरभ संचेती म्हणाले की हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ताणतणावामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे काही जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावा, पत्रकारांसाठी संचेती हॉस्पिटल मध्ये निःशुल्क उपचार केले जातील असा आशापाद व्यक्त केला. तर डॉ. रवी शिंदे यांनी पत्रकार हे समाजाचे आरोग्य जप्त असतात पण त्यांचे आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शिबरिला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर या शिविराच्या यशस्वितेसाठी सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसिम शेख, प्रदेश प्रीतिनिधी पुवराज वाघ, महिला सेलच्या अध्यक्ष मृणाल सावळे सहसचिव शिवाजी मामलकर यांनी परिश्रम घेतले. शिबिरात पत्रकार सर्वश्री जितेंद्र कायस्थ, राजेश दिडोलकर, संजय जाधव, संदीप शुक्ला, चाबासाहेब जाधव, संजय मोहिते, रवी गणेशे, प्रा. सुभाष लहाने, भानुदास लकडे, प्रेमकुमार राठोड, ब्रह्मानंद जाधव, दिनेश मुडे, पृथ्वीराज चौहान, रविकिरण टाकळकर, पपन सोनारे, संदीप वानखेडे, सुनील मोरे, जाकिर श्वह, अजय राजगुरे, गोमत अली, अजय काकडे, राम हिंगे, इसरार देशमुख, संदीप पंत्रोले, शेख इद्रिस, विलास खंडेराव, आदेश कांडेलकर, शाकिर हुसैन, सै. इरफान यांच्या सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
Users Today : 15