पाण्याची टाकी तहानलेलीच

Khozmaster
1 Min Read

लोणार 🙁  तान्हाजी मापारी )

येथून जवळच असलेले वेणी है  गाव    ५ हजार मिश्र लोकवस्ती असलेले तालुक्यातील भलेमोठे गाव आहे.  गावाचा    विकास हा शिक्षण, आरोग्य, कामधंदे, उद्योग च मूलभूत सोयी सुविधा यावर अवलंबून असतो. या पैकी एखादी गोष्ट जरी अपुरी  पडली    तरी गावाचा विकास  दुराखला    जातो पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलडाणा जलजीवन मिशन अंतर्गत मौजे वेणी येथे मागील ४ वर्षांपासुन १.८० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी चे  बांधकम   सुरु होते. सरपंचा सौ. उषाताई तांबिले यांच्या कार्यकाळात ते पूर्ण झाले असून गावात पिण्याचे पाणी ही समस्या मिटवण्याची आशा निर्माण झाली आहे. पण टाकी पूर्ण होऊन, महिने झाले तरी सुध्दा टाकीत पाणी पडलेले नाही, पाणी सुरू झाले तर गावातील इतर दौन खाजगी पाईप लाईन  सोबतच   या पाण्याचा सुद्धा उन्हाळ्यात जनतेला फायदा होऊ शकतो, अशी  गावातील    लोकांनी इच्छा व्यक्त केली. ठेकेदारी पद्धतीत अडकलेल्या या योजनेचा ठेकेदारांच्या दिरंगाई मुळे  गावतील जनता ही शुध्द पाण्यापासून वंचित राहत आहे, तरी लवकरात लवकर आम्हाला पिण्याचे पाणी मिळावे व गावातील पाण्याची समस्या मिटावी,  अन्यथा    आम्ही तीव्र आंदोलनाचा पवित्रा उभारु अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली.
0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *