देऊळगावराजा:- ( तालुका प्रतिनिधी )
तालुक्यातील रोहणा गावचे सुपुत्र तथा लष्करी जवान कैलास डोके यांच्यावर आज, ६ जानेवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आमदार मनोज कार्यदे, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. शशिकांत खेडेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कार्यदे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, भगवान मुंडे, प्रा. दिलीप सानप, अनिल चित्ते, श्रीनिवास खेडेकर, गजानन काकड, दीपक बोरकर, राजू चित्ते, सदाशिव मुंडे, सुभाष सवडे, लक्ष्मण डोके यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी साश्रू नयनांनी जवान कैलास डोके यांना मानवंदना दिली. अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
एका महिन्याच्या रजेवर आलेले डोके हे रविवार, ५ जानेवारी रोजी दुचाकीने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कैलास वसंता डोके हे जम्मू कश्मीर येथे कर्तव्यावर होते. २९ मार्च २०१९ रोजी ते सैन्य दलामध्ये जळगाव येथे भरती झाले. त्यांनी पुण्यातील बॉम्बे इंजीनिअरींग सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. जम्मू काश्मीर या ठिकाणी सीमेवर ते देशसेवेत तैनात झाले होते.
दरम्यान, एका महिन्याची रजा घेऊन ते गावी रोहणा येथे आले होते. कुटुंबीयांच्या व मित्रमंडळीच्या सहवासात राहून ते रविवारी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाले होते. मात्र, मध्येच दुर्दैवी अपघात घडला. यामध्ये कैलास डोके यांचा मृत्यू झाला.

Users Today : 15